www.24taas.com, मुंबई
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला कलह वाढतच चालल्याचं दिसतंय. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार यांचे नाव न घेता टोले लागवले.
पवारांकडून राज्यपालांवर होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना दुष्काळात एखाद्या भागाला निधी वाढवून देण्याचा अधिकार राज्यपालांना नाही, त्यांचे हात कायद्याने बांधलेले आहेत अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची पाठराखण केली. तर एमएमआरडीएनं जमिनी विकून जमवलेला पैसा विकासकामांवर खर्च केला, असं उत्तरही त्यांनी पवारांना दिलंय. मुंबईत मेट्रो, मोनो रेल्वेची कामं सुरु आहेत त्यांना पैसा लागतो असं सुनवायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. श्वेतपत्रिका काढण्यात राजकारण नाही, राज्याचा प्रमुख म्हणून सिचनाच्या स्थितीवर लोक मलाच विचारतील, त्यामुळे आढावा घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
शनिवारीही मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर निर्यात धोरणाबाबत टीका केली होती. निर्यातीबाबत चुकीच्या धोरणामुळं राज्याला फटका बसत असून शेतक-यांचं नुकसान होत असल्याचं चव्हाण यांनी कोल्हापूर इथं म्हटलं होतं.