युतीविरोधात 'स्वाभिमान'चा सिनेमा

मुंबई महापालिका निवडणूकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात प्रचारासाठी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे सज्ज झालेत. महापालिकेतील युतीच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी नितेश यांनी मुंबईतल्या पाणी टंचाईवर लक्ष केंद्रीत केलंय.

Updated: Jan 7, 2012, 10:51 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई महापालिका निवडणूकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात प्रचारासाठी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे सज्ज झालेत.

 

महापालिकेतील युतीच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी नितेश यांनी मुंबईतल्या पाणी टंचाईवर लक्ष केंद्रीत केलंय. त्यावर त्यांनी वॉटर माफिया या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उद्या रविवारी या चित्रपटाचा प्रीमीयर नितेश राणे यांच्या उपस्थितीत होत आहे.

 

पाणी चोरी, वॉटर टँकर लॉबी आणि त्यांचे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध यावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.चाळीस मिनीटांची डॉक्युमेंटरी पद्घतीची ही फिल्म आहे. यात काही स्टिंग ऑपरेशनचाही समावेश आहे.

 

[jwplayer mediaid="25311"]