www.24taas.com, मुंबई
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर आणखीनच अडचणीत सापडले आहेत. राज्यपाल वेळुकर यांच्या कारकिर्दीबाबत नाराज आहेत. त्यातच वेळूकर यांनी नितेश राणे यांची भेट घेतल्यानं नाराजीच आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे राज्यपाल कुलगुरू विद्यापीठ यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाचा अर्थसंकल्प राज्यपालांनी सादर करण्याची युवासेनेची मागणी होती. तसंच T.Y.B.COM.च्या परिक्षेतील घोळाविरोधात कुलुगुरूंना युवासेनेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. बी.कॉमच्या अर्थशास्त्राचा पेपर जुन्या अभ्यासक्रमाऐवजी नव्या अभ्यासक्रमानुसार घेतल्याने ९०० विद्यार्थ्यांचं भवितव्य संकटात आहे, तर हॉल तिकीटावरील परिक्षा केंद्र एक आणि परीक्षा दुसऱ्याच केंद्रावर असल्याचेही प्रकार घडले होते. या सर्व मुद्यावरुन युवासेना आक्रमक तर झाली आहेच. शिवाय शिवसेनेनंही विधानपरिषदेत हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. पण मुंबई विद्यापीठातल्या घोळासंदर्भात युवासेनेनं केलेल्या आंदोलनानंतर कुलगुरु राजन वेळूकर यांनी युवासेनेच्या ८ सिनेट सदस्यांना निलंबित केलं.
मुंबई विद्यापीठाच्या कामकाजावरुन युवा सेना आक्रमक झाली असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीनंही यात उडी घेऊन वेळूकर यांना पाठिशी घातलं होते. त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रात पक्षीय राजकारण सुरु झाल्याचं दिसू लागलं होतं. यामुळेच राज्यपाल वेळुकर यांच्या कारकिर्दीबाबत नाराज आहेत.
[jwplayer mediaid="77684"]