राज ठाकरे - सरसंघचालक यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली.

Updated: Dec 30, 2011, 05:30 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची आज सदिच्छा भेट घेतली.

 

मुंबईत शिवाजी पार्क इथं झालेल्या या भेटीला महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महत्त्व आलंय. मात्र, भेटीचा अधिक तपशील मिळू शकला नाही.

 

या भेटीमुळे राज ठाकरे आणि भाजप सलगीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलंय.  त्यातच राज यांची भाजप अध्यक्ष नितीन गडकरींशी मैत्रीपूर्ण संबंध असून याआधी दोन्ही नेत्यांमध्ये बेळगाव प्रश्नी चर्चाही झाली होती. इतकंच नाही तर गुजरात दौ-यात नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यातच आता सरसंघचालकांच्या या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.