वेश्या महिला अटकेत, राम कदमांची शोध मोहिम

मनसे आमदार राम कदम यांनी रात्रभर जागून सांताक्रूज परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांना आणि किन्नरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मनसे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर देहविक्री करणाऱ्या महिलांचा शोध घेतला.

Updated: Nov 19, 2011, 11:31 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मनसे आमदार राम कदम यांनी रात्रभर जागून सांताक्रूज परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांना आणि किन्नरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मनसे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर देहविक्री करणाऱ्या महिलांचा शोध घेतला. राम कदम राहतात तो परिसर वेश्या व्यवसायामुळे बदमान असल्याचं बोललं जातं होतं. देहविक्री करणाऱ्या महिलांमुळे सांताक्रुज परिसरातील लोकांना त्यांचा त्रास होतं होता.

 

रात्री घरी परतत असतांना मनसे आमदार राम कदम यांना या महिला आणि किन्नर देहविक्री करतांना सातांक्रुज परिसरात दिसले. त्यांनी या महिलांना आपल्या कार्यकर्त्यांचा मदतीनं पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा मुद्दा आपण येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात उचलाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विरोधकांना मात्र हा पब्लिसिटी स्टटं असल्याचं म्हटलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मनसे नेते राम कदम सक्रिय झालेत अशीही चर्चा रंगली.