शिवाजी स्मारकावरून विधानसभेत गोंधळ

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकानी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला. दरम्यान, समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाबाबत सरकार कटीबद्ध , असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोंधळ कमी करण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

Updated: Mar 15, 2012, 07:55 PM IST

www.24taas.com, मुंबई

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकानी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला. दरम्यान,  समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाबाबत सरकार कटीबद्ध , असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोंधळ कमी करण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

विधान परिषदेत विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी सरकारला धारेवर धरत स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली. स्थगन प्रस्तावावरील चर्चेला सभापतींनी मान्यता दिलीये. उद्या प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधान परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे. सरकारने छत्रपतीच्या स्मारकासंदर्भातील आपली भुमिका स्पष्ट करावी अशी विरोधकानी मागणी केली.

लवासासंदर्भात अनेक बैठकी घेणा-या सरकारने छत्रपतींच्या स्मारकासाठी कितीवेळा पाठपुरावा केला असा विरोधकानी सवाल करत सरकारला धारेवर धरलय तर शिवस्मारकासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला पर्यावरण मंत्रालयाच्या विरोधामुळे बारगळला, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दिली होती. त्यावरुन स्मारकासाठी नवी जागा किनारपट्टीवर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. १०० कोटींच्या प्रस्तावित स्मारकावरुन विरोधकानी आता सरकारला घेरल्यावर मुख्यमंत्र्यानी पर्यावरण मंत्रालयानं परवानगी नाकारली नसल्याचा खुलासा केलासा केला.