लागोपाठ आठ दिसवसांच्या घसरगुंडीनंतर सेन्सेकमध्ये १५१ अंशाने वाढ झाली आहे. आज मंगळवारी शेअर मार्केट उघडल्यावर सेन्सेकमध्ये थोडीफार सुधारणा झाली. जागतिक शेअर बाजारात मंदी असल्याने भारतीय शेअर बाजारात चढ उतार दिसून येत आहे.गेल्या आठ दिवसात शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून येत होती.
रुपयाने दोन वर्षांतील नीचांकी मूल्य गाठल्यामुळे आणि युरोपतील वित्तीय पेचाबरोबर अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावण्याच्या भीतीने सोमवारी शेअर बाजार गडगडला.जागतिक शेअर बाजारातही मंदीसदृश वातवरण होते. त्याचा प्रभाव भारतीय शेअर बाजावर पडला.
युरोपातील वित्तीय पेचावर ठोस उपाय योजले जाण्याची संकेत मिळत नसून, अमेरिकेत मंदी येण्याची भीती आहे. त्याचप्रमाणे अन्य मोठ्या अर्थव्यवस्थांनाही मंदीस सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे.