श्री. उद्धव ठाकरे, झी २४ तासचे गेस्ट एडिटर

शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांचे झी २४ तासचे गेस्ट एडिटर म्हणून झी २४ तासच्या कार्यालयात आगमन झाले. उद्धव ठाकरेंच्या भेटीने कार्यालयातील नूरच पालटून गेला आहे.

Updated: Dec 1, 2011, 05:54 AM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे झी २४ तासचे गेस्ट एडिटर म्हणून झी २४ तासच्या कार्यालयात आगमन झाले. उद्धव ठाकरेंच्या भेटीने कार्यालयातील नूरच पालटून गेला.

 

आज उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शानाखाली झी २४ तासच्या बातम्यांचा प्रवास सुरू होणार आहे. तसेच त्यांच्या सोबत दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे देखील मार्गदर्शन मिळणार आहे.

 

यामुळे झी २४ तासच्या कर्मचारी वर्गात उत्साहाचे आणि उल्हासाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संपादक मंदार परब यांच्या केबिन बाहेर एकच गर्दी उसळली आणि फोटो काढण्यासाठी चढाओढ सुरु झाली. उद्धव ठाकरे हे आता थोड्याच वेळात झी २४ तासच्या सर्व विभागांना भेट देणार आहेत आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

 

गेस्ट एडिटर म्हणून येथील चालणारे कामकाज ते आज समजून घेणार आहेत. त्यानंतर दिवसभरातील एकूणच बातम्या कोणत्या पद्धतीने जाणार याचा आढावा देखील गेस्ट एडिटर उद्धव ठाकरे घेणार आहेत. यानंतर ते येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.खील गेस्ट एडिटर  उद्धव ठाकरे घेणार आहेत.  यानंतर ते येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.