सर्वसामान्यांना विजेचा शाॅक

राज्यात भारनियमनात वाढ होत असताना सरकारने आजपासून ४५ पैसे प्रती युनिट वीज दरवाढ केली आहे.

Updated: Nov 1, 2011, 02:41 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

राज्यात भारनियमनात वाढ होत असताना महावितरणने आजपासून ४१ पैसे प्रती युनिट वीज दरवाढ केली आहे. त्यामुळे विजेचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागणार आहेत.

भारनियमनाने त्रस्त असलेले वीजग्राहक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (महावितरण ) ४१पैसे प्रती युनिट वीज दरवाढ या निर्णयामुळे संतप्त झाले आहेत. कोळशाची टंचाई असल्याने वीज निर्माण करण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे राज्यात विजेचे संकट आहे. यामुळे भारनियमनात वाढ करण्यात येत आहे. त्यातच सरकारने आजपासून ४१ पैसे प्रती युनिट वीज दरवाढ केल्याने सर्वसामान्यांना विजेचा शाॅक बसला आहे.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटास ऊर्जामंत्री अजित पवार जबबादार असल्याची टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. दिवाळीच्या दिवशी अर्धा महाराष्ट्र अंधारात होता, असा आरोपही खडसे यांनी केलाय.