सावधान! समुद्राला येणार उधाण

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.... वीकेण्ड प्लॅन करताना समुद्रावर फिरायला जायचा विचार असेल तर काळजी घ्या....पुढचे दोन दिवस समुद्रापासून सावध राहा.... पुढच्या दोन दिवसांत समुद्राला मोठं उधाण येईल तेव्हा सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने केले आहे.

Updated: May 5, 2012, 12:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.... वीकेण्ड प्लॅन करताना समुद्रावर फिरायला जायचा विचार असेल तर काळजी घ्या....पुढचे दोन दिवस समुद्रापासून सावध राहा.... पुढच्या दोन दिवसांत समुद्राला मोठं उधाण येईल तेव्हा सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने केले आहे.

पृथ्वी आणि चंद्र जवळ आल्यानं समुद्रात दशकातली सर्वात मोठी भरती भरती येणार आहे. विशेषतः मुंबईतल्या समुद्रात तब्बल पाच मीटर उंचीच्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे. सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी आणि पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र यामुळे समुद्राला भरती-ओहोटी येत असते. या भ्रमण कक्षेत नेहमी बदल होत असतात. काही वेळा चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यानं समुद्राला मोठी भरती येते.

ही घटना नैसर्गिक असली तरी खवळलेल्या समुद्रात सावध रहाणं गरजेचं असतं. त्यातच मान्सूनपूर्व करंट आणि वा-याचा वेग वाढल्यास लाटांची उंची वाढते आणि समुद्राचं पाणी किनारपट्टीत घुसण्याची शक्यता वाढते. या घटनेमुळे शनिवारी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी, रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी आणि 6 मे रोजी सकाळी 11 वाजून 9 मिनिटांनी मोठी भरती येईल, असं राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या संचालकांनी सांगितलंय.  समुद्र किनारपट्टीच्या भागात त्यामुळे सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेनं केले आहे.

व्हिडिओ पाहा

[jwplayer mediaid="95010"]