'दबंग' वसंत ढोबळे क्राईम ब्रान्चमध्ये परतले!

बहुर्चित आणि विवादीत मुंबई पोलीस दलातील अधिकारी वसंत ढोबळे यांची मुंबई क्राईम ब्रान्च इथं बदली करण्यात आलीये.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 19, 2013, 09:37 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बहुर्चित आणि विवादीत मुंबई पोलीस दलातील अधिकारी वसंत ढोबळे यांची मुंबई क्राईम ब्रान्च इथं बदली करण्यात आलीये.
अनेकवेळा त्यांच्या धडाडीच्या कारवाईनं त्यांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या. नुकतचं एका प्रकरणात त्यांची कंट्रोल रुममध्ये बदली करण्यात आली होती. पण, त्या प्रकरणात त्यांना क्लीन चीट मिळालेल्यानंतर ढोबळेंची बदली आता मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये करण्यात आलीये.
मुंबईच्या नाईट लाईफवर वंसत ढोबळे यांनी केलेल्या कारवाईमुळं वसंत ढोबळे यांना जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळाला होता. त्यामुळं अनेक बारमालक आणि पब मालकांनी वसंत ढोबळे यांच्या विरोधात अनेक पातळीवर कारवाया केल्या होत्या.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.