१५० पोलीस अॅण्टी करप्शनच्या सापळ्यात

सरकारी विभागातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी अॅण्टी करप्शन विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांपेक्षा लाचखोर पोलीस पहिल्या स्थानावर आहेत.

Updated: May 13, 2014, 07:26 PM IST

www.24taas.com, झी मीडीया, मुंबई
सरकारी विभागातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी अॅण्टी करप्शन विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांपेक्षा लाचखोर पोलीस पहिल्या स्थानावर आहेत.
तसेच अपर पोलीस महासंचालक यांनीही लाचखोर पोलिसांच्या कारणांची यादी बनवण्याचे आदेश दिले आहेत. २०१२ मध्ये १६५ लाचखोर पोलीस तर, २०१३ मध्ये २२१ लाचखोर पोलीसांना पकडण्यात यश आले होते. दीक्षित यांच्या कारर्कीदीत पहिल्या सहा महिन्यात १५० पोलीस लाच घेताना सापळ्यात अडकले.
मात्र भ्रष्टाचार करणाऱ्यांची यादी वगळता, अजून वेगळ्या गोष्टींसाठीही लाच घेतली जाते आणि अशा पोलिसांची तक्रार होत नाही. त्यामुळे लाचखोरीसारखे गैरप्रकार थांबवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी असे, काही पोलिसांचे म्हणणे आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.