नवी मुंबईतील २० हजार अनधिकृत बांधकामे होणार नियमित

 नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील 20 हजार अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा करण्याची घोषणा केली आहे. 

Updated: Mar 12, 2015, 02:23 PM IST
नवी मुंबईतील २० हजार अनधिकृत बांधकामे होणार नियमित  title=

मुंबई :  नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील 20 हजार अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा करण्याची घोषणा केली आहे. 

क्लस्टर डेव्हलपमेंट योजने अंतर्गत या अनधिकृत बांधकामांचा पुनर्विकास होणार असून यासाठी ४ एफएसआय देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. 

नवी मुंबई महापालिका हद्दीत 14 हजार अनधिकृत बांधकामे, तर सिडको हद्दीत 6 हजार बांधकामे नियमीत होणार आहे. दाटीवाटीने आणि नियोजनाशिवाय अस्ताव्यस्त उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांचा होणार पुनर्विकास होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पुनर्विकासामुळे नियोजनबद्ध इमारती आणि रुंद रस्ते तयार होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

ठळक बाबी
- नवी मुंबईतील 20 हजार अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
- क्लस्टर योजने अंतर्गत या बांधकामांचा होणार पुनर्विकास
- पुनर्विकासासाठी 4 एफएसआय देणार
- मुख्यमंत्र्यांनी केली विधानसभेत घोषणा
- नवी मुंबई महापालिका हद्दीत 14 हजार अनधिकृत बांधकामे, तर सिडको हद्दीत 6 हजार बांधकामे
- दाटीवाटीने आणि नियोजनाशिवाय अस्ताव्यस्त उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांचा होणार पुनर्विकास
- पुनर्विकासामुळे नियोजनबद्ध इमारती आणि रुंद रस्ते तयार होतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.