आदिवासी खेळाडूंनाही २५ वाढीव गुणांचा फायदा

आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी खेळाडूला २५ वाढीव गुण, पाच टक्के खेळाडू आरक्षण या सवलतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.

Updated: Feb 18, 2015, 11:05 PM IST
आदिवासी खेळाडूंनाही २५ वाढीव गुणांचा फायदा title=

मुंबई : आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी खेळाडूला २५ वाढीव गुण, पाच टक्के खेळाडू आरक्षण या सवलतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.

आदिवासी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांना क्रीडा विभागाच्या स्पर्धांप्रमाणे दर्जा देण्याचा निर्णय, राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी घेतला. आदिवासी खेळाडू हे आदिवासी विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतात. 

मात्र, या स्पर्धांना क्रीडा संचालनालयाची मान्यता नसल्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विजयी खेळाडूंना २५ वाढीव गुणांचा फायदा मिळत नव्हता, परंतु, यासंदर्भात तावडे यांच्याकडे अनेक लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांनी आदिवासी खेळाडूंना विविध सवलती मिळण्यासाठी विनंती केली होती. 

यासंदर्भात तावडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आदिवासी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.