गोरेगाव सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांना अटक

मुंबईच्या गोरेगाव भागामध्ये एक नोव्हेंबर रोजी रात्री १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 5, 2013, 01:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या गोरेगाव भागामध्ये एक नोव्हेंबर रोजी रात्री १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. आणखी तीन आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती सापडलेले नाहीत. पोलीस अटकेतील आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत सहा लोकांचा समावेश होता. पोलिसांच्या माहितीनुसार, गोरेगावच्या संतोष नगर भागात राहणाऱ्या काही युवकांनी शुक्रवारी पीडित अल्पवयीन मुलीला दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या बरोबर येण्यास सांगितलं. ही मुलगी या मुलांना ओळखतं होती त्यामुळे ती त्यांच्याबरोबर बिनदिक्कतपणे गेली. यानंतर या आरोपींनी तिला एका एकांताच्या ठिकाणी नेऊन कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून दिलं. ही मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर सहा पैंकी चार युवकांनी एक-एक करून तिच्यावर बलात्कार केला. यातील सर्व आरोपींचं वय २० ते ३० वर्षांदरम्यान आहे.

घटनेनं पुरत्या हादरलेल्या ही मुलगी रविवारपर्यंत गप्प राहिली परंतु आपल्या यानंतर मात्र तिनं आपल्या आजीजवळ घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पीडितेनं आणि पीडितेच्या आजीनं दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी ‘एफआयआर’ नोंदविला. या प्रकरणाची नोंद भारतीय संविधानाच्या कलम ३७६ (जी) नुसार, दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलीय. आठवी इयत्तेनंतर पीडितेनं शिक्षणाला पूर्णविराम दिला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.