31stची 'रात', पोलीस करणार दहशतीवर 'मात'?

नविन वर्षाचा स्वागताच्या रात्रीसाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. या रात्री संपुर्ण मुंबईच्या मायानगरीला छावणीचे स्वरूप येणार आहे. पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबरची एक अशी रात्र जेव्हा मायानगरीचा दर दुसरा व्यक्ती नविन वर्षाचा स्वागत करतो.

Updated: Dec 29, 2011, 10:20 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

नविन वर्षाचा स्वागताच्या रात्रीसाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. या रात्री संपुर्ण मुंबईच्या मायानगरीला छावणीचे स्वरूप येणार आहे. पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबरची एक अशी रात्र जेव्हा मायानगरीचा दर दुसरा व्यक्ती  नविन वर्षाचा स्वागत करतो.

सार्वजनिक ठिकाणीवर हजारोंच्या संख्येने जमाव एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करता. पण याच गर्दीत माणसांच्या वेषात असतात वासनांध. ३१ डिसेंबरच्या रात्री महिलांची  छेड काढण्याचा प्रकार ह्या आधीही मुंबईत झाले आहेत. आणि म्हणूनच यावेळी 31 st ची रात्र महिलांसाठी काळ रात्र ठरू नये यासाठी मुंबई पोलीसांनी कंबर कसली आहे.

मुंबई पोलीसांनी ३१ डिसेंबरचा रात्री सुरक्षेचा दृष्टीने रचलेला चक्रव्युह 

* तब्बल 30 हजार पोलीस सुरक्षेसाठी रस्त्यावर तैनात असतील.

* गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट,जुहु, बॅंडस्टॅंडपोलिसांची कुमक असेल.

* वरळी चौपाटी सह इतर महत्त्वाच्या ठिकाणी गर्दीत साध्या गणवेशात पोलीस असतील.

* सीसीटीवी कॅमेऱ्याने गर्दीचा ठिकाणी नजर ठेवली जाणार.

* सगळ्या पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.

* रोड रोमियोंवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक.

दहशतवादी हल्ल्याच्या धोका नेहमीच मुंबईवर असतो. त्या दृष्टीनेही पोलीस सतर्क आहेत. एकूणच पोलीस मुंबईला सुरक्षित ठेवण्याच पुर्ण प्रयत्न करत आहेत. पण सामान्य नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचं आहे. कारण, प्रत्येक ठिकाणी पोलिसही पोहचू शकत नाही.