चोरी लपवण्यासाठी 7 वर्षीय बालिकेची हत्या

मुंबईतील चेंबूर भागात एका सात वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. चोरी करतांना या मुलीनं पाहिल्याने, या मुलीची हत्या करण्यात आली आहे.

Updated: Jun 4, 2014, 05:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील चेंबूर भागात एका सात वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे. चोरी करतांना या मुलीनं पाहिल्याने, या मुलीची हत्या करण्यात आली आहे.
ही चोरी शेजारच्या घरात होत होती. 30 वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आरोपी दिवाकर हजाराने या मुलीचं डोक पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं, यावरून या मुलीचा बुडून मृत्यू झालाचं वाटेल, असं हजाराला वाटतं होतं.
आरोपीने सोमवारी दुपारी चेंबूरच्या नुरानी मशीदीजवळ ब्युटीच्या घरी गेला आणि चोरी करत होता. मात्र ब्युटीने पाहिल्याने तिने ते तिच्या आईवडिलांना सांगू नये, म्हणून ब्युटीचा गळा दाबला..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.