www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. इमारतीच्या गच्चीवरील जवळपास ७५ टक्के मोबाइल टॉवर हे बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मुंबईतील ७५ टक्के मोबाइल टॉवर बेकायदा असल्याचे पालिकेने जाहीर केलेय.
मुंबईत एकूण ४७७६ मोबाइल टॉवर आहेत. यामध्ये चेंबूर आणि गोवंडीत ९५ टक्के टॉवर अनधिकृत आहेत. बेकायदा टॉवर्सची यादीच पालिकेने portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून जाहीर केली आहे. अनधिकृत मोबाइल टॉवर्सवर निर्बंध आणण्यासाठी पालिकेने धोरण तयार केलेय. त्यामुळे ही अनधिकृत टॉवरची यादी तयार करण्यात आलेय.
मुंबई पालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार मुंबईत केवळ ११५८ टॉवर्स अधिकृत आहेत. तर सर्वाधिक बेकायदा टॉवर्सचे प्रमाण बोरीवलीमध्ये आहे. चेंबूर, गोवंडी या भागातील ९५ टक्के टॉवर्स बेकायदा आहेत. त्यापाठोपाठ ग्रँट रोड, वांद्रे ते जोगेश्वंरी या भागांमध्ये बेकायदा टॉवर्सचे प्रमाण अधिक आहे.
इमारतीच्या गच्चीवर असलेला मोबाइल टॉवर अधिकृत आहे का, याची माहिती थेट संकेतस्थळावरून पालिकेने जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईतील ७५ टक्के मोबाइल टॉवर्स बेकायदा असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. तसेच चेंबूर आणि गोवंडीत ९५ टक्के सर्वाधिक टॉवर अनधिकृत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.