मुंबईत डेंग्युचे ९५९ रुग्ण, उच्चभ्रू वस्ती सर्वाधिक

मुंबई शहरात आत्तापर्यंत डेंग्यूचे 959 रुग्ण आढळून आलेत. त्यातले 50 टक्के रुग्ण हे उच्चभ्रू वसाहतीतले असल्याचं समोर आलंय.

Updated: Nov 5, 2014, 09:20 PM IST
मुंबईत डेंग्युचे ९५९ रुग्ण, उच्चभ्रू वस्ती सर्वाधिक title=

मुंबई : मुंबई शहरात आत्तापर्यंत डेंग्यूचे 959 रुग्ण आढळून आलेत. त्यातले 50 टक्के रुग्ण हे उच्चभ्रू वसाहतीतले असल्याचं समोर आलंय.

जुन्या चाळींमध्ये 40 टक्के केसेस तर केवळ 10 टक्के केसेस झोपडपट्टीमध्ये आढळून आल्यात. हिवाळा सुरु होण्यास उशीर होत असल्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय. उच्चभ्रू वसाहतींमध्ये महापालिकेच्या कर्मचा-यांना तपासणीसाठी प्रवेश दिला जात नसल्याचंही याप्रकरणी समोर आलंय.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील 900 कर्मचारी महिन्याला सात लाख घरांची तपासणी करतात. मात्र सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये हे प्रमाण 9 ते 10 लाखांवर गेलंय. आत्तापर्यंत महापालिकेकडून डेंग्यूचे डास आढळून आल्याप्रकरणी 13247 नोटीसा पाठवण्यात आल्यायत. तर 864 खटले दाखल करण्यात आलेत..त्यापैकी 344 खटले बोर्डावर येऊ शकलेत. तसंच महापालिकेनं आत्तापर्यंत 23 लाख 22 हजारांचा दंड वसूल केलाय.

राज्यात २४ जणांना डेंग्यूने मृत्यू

राज्यभरात डेंग्युने थैमान घातलंय. 24 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 3 हजार 565 रूग्ण डेंग्यून बाधीत आढळले. तसंच राज्यभरात 31 हजार 201 डेंग्यू सदृश्य रूग्णांची तपासणीही करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 24 रूग्णांचा डेंग्युने मृत्यू ओढवला आहे.

केईएमच्या तीन डॉक्टरांना डेंग्यू

केईएममध्ये तीन डॉक्टर्सना डेंग्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येतेय. डॉ. वृज दुर्वे, डॉ. शशी यादव, आणि डॉ. अरविंद सिंग या तीन डॉक्टर्सना डेंग्यू झालाय.

 त्यापैकी दोन डॉक्टर्सवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर एका डॉक्टरवर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता.

मुंबईत वर्षभरात जवळपास साडे सहाशे जणांना डेंग्यूची लागण झालीय, तर 10 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईकरांनो, डेंग्यूपासून सावध राहा आणि स्वतःची काळजी घ्या.

ठाण्यात डेंग्यूबरोबर इतर साथीचे आजार

डेंग्यूबरोबरच मलेरिया आणि साथीचे आजारही मोठ्या प्रमाणात मुंबईत पसरतायत. ठाण्यातल्या एकाच बिल्डिंगमध्ये साथीच्या आजारांचे तब्बल २५ पेशंटस आढळलेत. ठाणे महापालिका ठाणेकरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय.

नाशिकमध्ये डेंग्यूचे ४५४ रूग्ण

डेंग्यूचा प्रसार नाशिक जिल्ह्यातही झालाय... एकूण चारशे चौपन्न संशयित रुग्ण यात आढळून आले असून सत्तर रुग्णांना डेंग्यू झाल्याचं स्पष्ट झालंय...यापैकी एकूण सहा जणांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे.

यात नाशिक महापालिकेत एक, मालेगावमध्ये एक तर ग्रामीण भागात चार मृत्यू झाले आहेत. यात मालेगावात सध्या गंभीर परिस्थिती असून नाशिक महापालिकाही डेंग्यू नियंत्रित करण्यासाठी धावपळ सुरु आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.