मुंबई : मुंबई पोलिसांनी भाजी विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली. ही महिला भाजी विकण्याबरोबरच हत्यारांची तस्करी करायची. पोलिसांना माहिती मिळताच सापळा रचून या महिलेला जोगेश्वरीतून ताब्यात घेतले.
ही महिला मुंबईत हत्यारे विकणे आणि लपवणे याचा व्यवसाय करायची. प्रमिला नाडर असे या महिलेचे नाव आहे. प्रमिला बऱ्याच काळापासून हत्यारांच्या तस्करीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. मुंबईत अशा अनेक प्रमिला आहेत ज्या हत्यार तस्करीत मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. ज्यांचा वापर करुन मुंबईत हत्यारांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केली जात आहे.
तीन दिवसांपूर्वी जोगेश्वरी पोलीस स्टेशनला एक निनावी फोन आला. तो फोन होता एका खबऱ्याचा. खबऱ्याने जोगेश्वरी पोलिसांनी अशी एक माहिती दिली, की ज्यामुळे जोगेश्वरी पोलीसांच्या पाया खालची वाळूच सरकली.
खबरी - साहबं, जोगेश्वरी के पूनमनगर की एक भाजीवाली भाजी के साथही ठेले पर बंदूक और बंदूक की गोलीया बेचती है। उसका नाम है प्रमिला नाडर, ही खबर मिळताच जोगेश्वरी पोलिसांनी प्रमिला ज्या ठिकाणी भाजी विकते तिकडे पाळत ठेवली. यावेळी पोलिसांनी आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली. प्रमिला नाडर भाजी विकण्यासोबच गुंडांना आणि मंगळसूत्र चोरांना देशी कट्टे आणि जीवंत काडतुसे विकाते.
प्रमिला ही हत्यार तस्करीच्या व्यवसायात गेल्या ४-५ वर्षांपासून आहे. देशी कट्टे आणि जीवंत काडतुसे विकण्याच्या व्यवसायात तिनं इतकं नाव कमावले होते की, तीने स्वत:चे एक रेट कार्डच बनवले होते. देशी कट्टे आणि जिवंत काडतुसे विकण्यासाठी तिने दोन रेट कार्ड बनवले होते. एक देशी कट्ट्याचा विक्रीभाव आणि एक देशी कट्टा भाड्याने देण्याचा भाव. त्यानुसार समोरचा ग्राहक बघून प्रमिला १ हजार, २ हजार आणि ३ हजार रुपयांना देशी कट्टा विकायची.
गुंडांच्या कामाचे स्वरुप म्हणजे दरोडा टाकण्याकरिता, मंगळसूत्र चोरी करण्याकरिता किंवा बंदुकीचा धाक दाखवून लूट करण्याकरिता २ हजार ते ६ हजार रुपयांना प्रमिला गुंडांना देशी कट्टा भाड्याने द्याची.
फक्त देशी कट्टे विकणे हाच व्यवसाय प्रमिला करत नव्हती तर गुन्ह्यांत वापरलेली हत्यारे गायब करण्याचे काम ही प्रमिला करायची. ४२ वर्षीय प्रमिला नाडर ही एकटीच महिला हत्यार तस्कर मुंबईत नाही. अशा अनेक 'प्रमिला नाडर' आहे. ज्या भाजी विक्री किंवा किरकोळ व्यवसायाच्या बहाने हत्यारांची फ्री होम डिलेव्हरी देखील करतात. अशा महिलांचा शोध घेणे हे सध्या मुंबई पोलिसांना कठीण होवून बसलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.