www.24taas.com, मुंबई
२६/११च्या मुंबई ह्ल्ल्यातील आरोपी अबु जिंदालनं गुन्ह्यांची कबुली देण्याची इच्छा व्यक्त केलीय आहे. त्यामुळे या हल्ल्याचा उलगडा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२६/११च्या हल्ल्यातील एक मुख्य आरोपी अबू जिंदाल याला आपल्या क्रुरकर्मांची कबुली द्यायचीये. खुद्द अबू जिंदालनेच याबाबत मुंबईतल्या न्यायालयात विनंती अर्ज सादर केलाय. २६/११च्या हल्ल्यात सहभाग असल्याची कबुली जिंदालला द्यायचीये. याबरोबरच आपल्यावरील सर्व गुन्हे कबुल करायचे असल्याचं जिंदाल म्हणतोय.
दरम्यान, लष्करे तोयबाचा अतिरेकी असलेल्या अबू जिंदालची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आता १४दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. न्यायालयाकडे केलेल्या अर्जाबाबत अबू जिंदालने कबुली देण्यात बाबत पूर्ण विचार करावा, असंही न्यायालयाने म्हटलंय.
कबुली दिल्यानंतर पुन्हा मागे हटता येणार नसल्याचं न्यायालयाने अबू जिंदालला बजावलंय आहे. त्यामुळे आता अबु काय माहिती देतो याकडे लक्ष आहे. त्यानुसार तपासाची दिशा ठरविण्यास मदत होईल.