मुंबईकरांसाठी चांगली बातमी

 मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मार्च महिन्यात एसी लोकल रुळांवर धावणार आहे.

Updated: Feb 18, 2016, 12:28 PM IST
मुंबईकरांसाठी चांगली बातमी title=

मुंबई: मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मार्च महिन्यात एसी लोकल रुळांवर धावणार आहे. रेल्वेच्या अधिका-यांनी ही माहिती दिलीय. 

मेक इन इंडियामध्ये रेल्वेमधल्या संधी या विषयावरच्या सेमिनारमध्ये ही घोषणा करण्यात आलीय.  मार्च महिन्यातल्या पहिला आठवडाभर ही ट्रेन पश्चिम रेल्वेवर धावणार आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला एसी लोकल धावणार असल्यानं,  उन्हाळ्यातला मुंबईकरांचा प्रवास थोडा दिलासादायक होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात तसंच बंद दरवाजाच्या लोकलमध्ये येणा-या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही रेल्वेतर्फे सांगण्यात आलंय.