मुंबई : मुंबईतली वादग्रस्त आदर्श इमारत जमिनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. आदर्श सोसायटीनं स्वखर्चानं ही इमारत पाडावी, असंही या आदेशात म्हटलंय.
पर्यावरण खात्याने सेझ नियमांतर्गत आदर्श इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशावर कोर्टानं शिक्कामोर्तब केलं. या प्रकरणी संरक्षण विभागानं चौकशी करावी आणि जे दोषी असणारे मंत्री, राजकारणी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेशही हायकोर्टानं दिलेत.
न्यायमूर्ती खेमकर आणि न्यायमूर्ती मोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दरम्यान, याप्रकरणी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी 12 आठवड्यांची मुदत देण्यात आलीये. सोसायटीच्या सदस्यांनीही या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय.