आदित्य ठाकरेंना झटका, युवासेनेचे दोन्ही जिम जमीनदोस्त होणार

मरीन लाईन्सवर आदित्य ठाकरेंच्या पुढाकारनं उभारण्यात आलेल्या ओपन एअर जिमची संकल्पना उच्चस्तरीय समितीनं फेटाळून लावलीय. त्यामुळं सध्या अस्तित्वात असणारी दोन जिमही जमीनदोस्त करावी लागणार आहेत. 

Updated: Nov 17, 2015, 10:46 AM IST
आदित्य ठाकरेंना झटका, युवासेनेचे दोन्ही जिम जमीनदोस्त होणार title=

मुंबई: मरीन लाईन्सवर आदित्य ठाकरेंच्या पुढाकारनं उभारण्यात आलेल्या ओपन एअर जिमची संकल्पना उच्चस्तरीय समितीनं फेटाळून लावलीय. त्यामुळं सध्या अस्तित्वात असणारी दोन जिमही जमीनदोस्त करावी लागणार आहेत. 

आणखी वाचा - आदित्यनं उद्घाटन केलेलं 'अनधिकृत' जीम उखडलं

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना मोठा झटका बसलाय. मरिन लाईन्सवर असणारी ही जिम्स लोकप्रिय असली, तरी त्यासाठी मरिन लाईन्स ही जागा नाही, असं या समितीनं म्हटलंय. उच्च न्यायालयानं नेमलेल्या या समितीत मुंबईचे आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त अहमद जावेद आणि हेरिटेज समितीच्या अध्यक्ष रामनाथ झा यांचा समावेश होता. 

आणखी वाचा - आदित्य ठाकरेंच्या ओपन जिमला १५ दिवसांत 'तडे'!

मरीन लाईन्सवर जिमला परवानगी दिल्यानं चुकीचा पायंडा पडेल असंही या समितीनं अहवालात म्हटलंय. दरम्यान बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी आता ही जिम दुसरीकडे हलवण्याची तयारी सुरू केल्याचं झी मीडियाचं सहकारी वृत्त पत्र डीएनएनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.