'चोखा बाटी'नंतर भाजपची 'छटपूजा'!

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना खूश करण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्यात.

Updated: Nov 3, 2016, 10:28 PM IST
'चोखा बाटी'नंतर भाजपची 'छटपूजा'! title=

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना खूश करण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्यात.

याआधी 2 सप्टेंबर रोजी बिहारी नागरिकांसाठी 'चोखा बाटी' कार्यक्रमांचं आयोजन भाजपनं केलं होतं. आता मुंबईत मोठ्या प्रमाणात छटपूजा साजरी करण्याचं भाजपनं ठरवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः छटपूजेत सहभागी होणार आहेत. 

कुलाबा, दादर शिवाजी पार्क, पवई, चेंबूर, संजय गांधी नॅशनल पार्क, जुहू चौपाटी, वर्सोवा, मालाड, आक्सा- मारवे, भांडुप, मुलुंड, कुर्ला, पोयसर अशा 12 समुद्रकिनाऱ्यांच्या ठिकाणी भाजपनं छटपूजा आयोजित करायचं ठरवलंय. 

बिहारी तसंच उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवून भाजपनं ही खेळी आखलीय, हे तर यातून उघडच होतंय.