www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अहमद जावेद हे नवे मुंबई पोलीस आयुक्त होण्याची शक्यता आहे. गृहखात्यातल्या सूत्रांनी ‘झी मीडिया’ला दिलेल्या माहितीनुसार अहमद जावेद यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही हिरवा कंदील दिलाय. विद्यमान पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांना पोलीस महासंचालकपदी बढती दिली जाऊ शकते. मुख्यमंत्री दिल्लीहून मुंबईला परत येताच अहमद जावेद यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
एक नजर टाकूयात अहमद जावेद यांच्या कार्यकालावर
- अहमद जावेद १९८० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत
- मुंबई पोलीस दलात त्यांनी सहपोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था या पदावरही काम केलंय
- अतिरिक्त पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त मध्य मुंबई, पोलीस आयुक्त नवी मुंबई
- अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था या पदांवरही अहमद जावेद यांनी काम केलंय.
अहमद जावेद यांची गाजलेली कामं
- नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर, सामान्य नागरिकांनी पोलिसांची भूमीका बजवावी या करता त्यांनी आपला मोबाईल क्रमांक जाहीर केली होता.
- चोरासाठी वृद्धांची हत्या करण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे आपल्या हद्दीतील वृद्धांवर नजर ठेवण्यासाठी अहमद जावेद यांनी एक विशेष पथक नेमलं होतं, हे पथक वृद्धांवर नज़र ठेवण्यापासून ते त्यांची प्रत्येक गरज पुरवण्याचं काम करायचं.
- महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अहमद जावेद यांनी जे पाऊल उचलंल होतं त्याचं कौतुक देशभरात करण्यात आलं होतं. महिलांनी पोलीस स्टेशनला न येताच फोनवरुन तक्रार नोंदवण्यासाठी त्यांनी महिलांसाठी एक विशेष हेल्पलाईन तयार केली होती