मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी होणार आहे. राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे.
सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाला चौकशी आयोगाला सामोरं जावं लागणार आहे. यात अजित पवारांचाही समावेश आहे. २१ मे रोजी चौकशी आयोगापुढे ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. कलम ८८ अंतर्गत, या प्रकरणाची चौकशी होणार आहे.
राज्य सहकारी बँकेत १५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
- संचालक मंडळाने सूचनांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
- ९ साखर कारखान्यांना कोटींचा कर्जपुरवठा
- गिरणा, सिंदखेडा कारखाना, सितगिरण्यांना ६० कोटींचं कर्ज
- केन अग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं ११९ कोटींचा तोटा
- २४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, २२५ कोटींची थकबाकी
- २२ कारखान्यांकडील १९५ कोटींचं कर्ज असुरक्षित
- लघुउद्योगाला दिलेल्या सव्वा तीन कोटींचं नुकसान
- कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री, ३७ कोटींचं नुकसान
- ८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६ कोटी १२ लाख रुपयांचा तोटा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.