मुंबई: मुंबईतील सर्वच उपहारगृहात महाराष्ट्रीयन पदार्थ मिळावेत यासाठी आता आरपीआयनं कंबर कसलीये. यासाठी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत तसंच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात असल्याचं आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितलंय.
हॉटेल मालक आणि राज्य सरकारकडून याविषयी सहकार्याची अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केली असून यामागे मराठी अमराठी वाद पेटवण्याचा उद्देश नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.. मात्र १५ दिवसांच्या आत यावर निर्णय न झाल्यास महाराष्ट्रीयन पदार्थ न देणाऱ्या हॉटेलसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला राज्यात मंत्रीपद, त्यासोबत महामंडळंही हवी आहेत अशी आग्रही भूमिका पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केलीय. रिपाइंला सत्तेत पाच टक्के वाटा हवा, असं आठवले म्हणाले. चीन दौऱ्याहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परत आल्यानंतर त्यांची तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याची माहिती आठवले यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.