रस्त्यावर थुंकाल तर सावधान!

मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.

Updated: Jan 11, 2015, 09:58 PM IST
रस्त्यावर थुंकाल तर सावधान! title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: मुंबईत आता रस्त्यावर थुंकणं हा गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकलात तर एफआयआर दाखल होऊ शकते. टॅक्सीवाल्यांनी हा गुन्हा केला तर त्यांचं लायसन्स रद्द होऊ शकतं. टीबीसारख्या रोगांवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे कठोर धोरण राबवलंय.

रस्त्यावर अशा प्रकारे थुंकणाऱ्यांचा तुम्हाला राग येत असेल. मात्र सरकारनं या प्रकाराला कितीही आळा घालण्याचा प्रयत्न केला तरी हे लोक सुधारणार नाहीत. थुंकणारे हे लोक रस्ते खराब करतातच पण त्याचबरोबर अनेक प्रकारचे आजारही पसरवत असतात. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारनं कठोर कायदा करणार आहे.

मुंबईत टीबीचे रूग्ण वाढत आहेत. मानवी थुंकीतून हा आजार मोठ्या प्रमाणात पसरतो. टीबीला प्रतिबंध आणण्यासाठी बीएमसीनं अमिताभ बच्चनला या मोहिमेत सहभागी केलंय. सफाई अभियान यशस्वी होण्यासाठी बॉलिवूड कलाकारांचीही साथ घेतली जात आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या भारत स्वच्छता अभियानाला यश तेव्हाच मिळेल जेव्हा नागरिक रस्त्यावर थुंकण्यासारख्या वाईट सवयी सोडून देतील.

मुंबईत रस्त्यावर थुंकणं, परिसर अस्वच्छ करणे यावर आधीपासूनच कायदेशीर रोख आहे. मात्र याविषयीची शिक्षा अगदीच कमी होती. त्यामुळं त्याची भिती नव्हती. मात्र आता कठोर कायदाच आणून कठोर शिक्षेची अंमलबजावणी करून मुंबईला स्वच्छ शहर करण्यासोबत टीबीसारखे रोग रोखण्याचा सरकारचा इरादा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.