...जेव्हा बिग बींनी लोकलनं प्रवास केला

बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करत मुंबईकरांना सुखद धक्का दिलाय... रविवारी सकाळी अचानक बिग बींनी सीएसटीवरुन भांडुपला जाणारी ट्रेन पकडली. यावेळी बिग बी आणि ट्रेनमधल्या प्रवाशांमध्ये गप्पाही रंगल्या.. 

Updated: Nov 15, 2015, 11:34 PM IST
...जेव्हा बिग बींनी लोकलनं प्रवास केला title=

मुंबई: बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करत मुंबईकरांना सुखद धक्का दिलाय... रविवारी सकाळी अचानक बिग बींनी सीएसटीवरुन भांडुपला जाणारी ट्रेन पकडली. यावेळी बिग बी आणि ट्रेनमधल्या प्रवाशांमध्ये गप्पाही रंगल्या.. 

महानायकाच्या उपस्थितीत मग ट्रेनमध्येच संगीत मैफलही रंगली.. यावेळी खुद्द बिग बींनी 'रंग बरसे' हे गाणंही गायलं.. बॉलिवूडचा शहेनशहा आपल्यासोबत प्रवास करतोय, हे पाहून मुंबईकरांचा आनंदही ओसंडून वाहत होता.. 

बिग बींसह सेल्फी आणि फोटो काढण्यासाठीही प्रवाशांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. एकूणच बिग बींचा हा लोकल प्रवास अनेकांसाठी संस्मरणीय ठरला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x