बाप्पासाठी सव्वा करोडोंचा मुकूट आणि डिझायनर धोतर

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणेश म्हणून 'अंधेरीचा राजा'ची ओळख आहे. यंदा पुन्हा एकदा अंधेरीचा राजाचं आगमन झालंय. यावेळी, हा बाप्पा आणखीनच विशेष बनलाय. 

Updated: Sep 16, 2015, 12:02 AM IST
बाप्पासाठी सव्वा करोडोंचा मुकूट आणि डिझायनर धोतर  title=

मुंबई : भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणेश म्हणून 'अंधेरीचा राजा'ची ओळख आहे. यंदा पुन्हा एकदा अंधेरीचा राजाचं आगमन झालंय. यावेळी, हा बाप्पा आणखीनच विशेष बनलाय. 

कारण, यंदा या अंधेरीच्या राजानं जे धोतर परिधान केलंय ते काही साधारण धोतर नाही... तर हे धोतर डिझाईन केलंय न्यूयॉर्कची डिझायनर असलेल्या साई सुमन हीनं... अर्थात त्यामुळे, या धोतराला पाहण्यासाठीही भाविकांना उत्सुकता लागलीय. 

गेल्या १५ वर्षांपासून साई सुमन अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येते. यावेळी, मात्र तिची इच्छा पूर्ण झाली आणि  तिला बाप्पासाठी धोतर डिझाईन करण्याची संधीही मिळाली. 

अंधेरीच्या राजाची मनमोहक मूर्ती तुम्हाला सोन्याचा मुकूट, डिझायनर धोतर आणि शालमध्ये दिसणार आहे. जवळपास ३००० भक्तांनी दिलेल्या दानातून अंधेरीच्या राजासाठी जवळपास ३.१ किलोचा सुवर्ण मुकूट बनवण्यात आलाय. या मुकूटाची किंमत आहे जवळपास १.२५ करोड रुपये.  

अंधेरीच्या राजाची ओळख 'बॉलिवूडचा बाप्पा' अशीही आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी शिल्पा शेट्टी, अजय देवगन, शाहीद कपूर असे अनेक सेलिब्रिटीही दाखल होतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.