मुंबई : मुलाच्या लग्नात हजर राहण्यासाठी गुंड अरूण गवळीने आता पॅरोलसाठी अर्ज केला आहे, पॅरोलसाठी अरूण गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अरूण गवळीने काही दिवसांपूर्वी केलेला पॅरोलचा अर्ज नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी फेटाळला होता. त्यामुळे 'डॅडी' पॅरोलसाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी अरूण गवळीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पॅरोलसाठी अर्ज दाखल केला.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, १६ मार्च २०१५ त्याची रवानगी मुंबईवरून नागपूरच्या कारागृहात करण्यात आली होती.
नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या अरुण गवळीच्या मुलाचा ९ मे रोजी मुंबईला टर्प क्लब मेंबर्स एनक्लोसर रेसकोर्स, महालक्ष्मी या ठिकाणी विवाह समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्या समारंभाला त्याला जायचे असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे पॅरोलवर जाण्यासाठी अर्ज केला होता.
मात्र, गवळी कारागृहाच्या बाहेर आला, तर साक्षीदाराच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा अहवाल गृहखात्याने दिल्यामुळे विभागीय आयुक्तांनी हा पॅरोल अर्ज फेटाळला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.