मुंबई : केईएम रूग्णालयात ४२ वर्षांपासून कोमात असलेल्या अरूणा शानबाग यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. अरूणा शानबाग यांचं आज सकाळी साडेआठ वाजता निधन झालं. अरूणा शानबाग यांना निमोनिया तसेच श्वसनाचा त्रास होता.
दरम्यान, अरुणा शानबाग यांचे कोणी नातेवाईक असल्यास पुढे यावं, असं आवाहन केईएम रुग्णालय प्रशासनाने केलं आहे.
नर्सचं शिक्षण घेणाऱ्या अरूणा शानबाग यांच्या हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयने १९७३ मध्ये पाशवी बलात्कार केला होता. या बलात्कारानंतर अरूणा शानबाग यांच्या सर्व संवेदना हरपल्या होत्या.
शानबाग यांना त्रासातून मुक्त करण्यासाठी दयामरणाच्या मार्गाचीही चर्चा झाली होती, मात्र दयामरणाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. दरम्यान अरुणा यांच्यावर बलात्कार करणारा बॉर्डबॉय शिक्षा भोगून सुटला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.