अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेय.

Updated: Feb 4, 2016, 03:13 PM IST
अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी title=

मुंबई : आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेय.

राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी कलम १२० ए आणि आयपीसी कलम ४२० अंतर्गत खटला चालवण्याची  सीबीआयला परवानगी दिलीय. त्यामुळं अशोक चव्हाण पुन्हा गोत्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी सीबीआयनं खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. यासंदर्भात राज्यापालांनी मंत्रिमंडळाकडे विचारणा केली होती. राज्य मंत्रिमंडळानं खटला चालवण्याला ग्रीन सिग्नल दिला होता.