मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्याने त्याचा परिणाम शाळा आणि कॉलेजच्या परीक्षांवर होत आहे. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे.
शाळांच्या सहामाही परीक्षा आणि कॉलेजची पहिली सेमिस्टर परीक्षा ऑक्टोबर महिन्यात येत असल्याने सध्या मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्या मनात परीक्षांचे वेळापत्रक ठरवण्याबाबत गोंधळ निर्माण झालाय. निवडणुकीच्या नेमक्या तारखा जोपर्यंत जाहीर होत नाहीत, तोपर्यंत शाळा आणि कॉलेज आपलं परीक्षांचं वेळापत्रक निश्चित करु शकत नाही. कारण ही परीक्षा जवळपास 15 दिवस चालते.
तसंच निवडणुकीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करत असतात. त्यामुळे ऑक्टोबरचे दोन आठवडे हे परीक्षांमध्येच जात असल्यामुळे तसंच शिक्षकांचं मनुष्यबळ निवडणुकांसाठी वापरलं जात असल्यामुळे परीक्षा आणि निवडणूक यामध्ये शिक्षक आणि पर्यायाने विद्यार्थ्यांची दमछाक होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.