सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारचे 'ते' निर्णय रद्द - फडणवीस

महायुतीची सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारनं अखेरच्या दीड महिन्यात घेतलेल्या निर्णायांच्या पुनर्विचार करून रद्द करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर रिपाइं नेते रामदास आठवले समजूतदार नेते असल्याचं सांगत आठवलेंचीही समजूत काढण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केलाय. 

Updated: Sep 10, 2014, 03:03 PM IST
सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारचे 'ते' निर्णय रद्द - फडणवीस title=

मुंबई :महायुतीची सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारनं अखेरच्या दीड महिन्यात घेतलेल्या निर्णायांच्या पुनर्विचार करून रद्द करणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. तर रिपाइं नेते रामदास आठवले समजूतदार नेते असल्याचं सांगत आठवलेंचीही समजूत काढण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केलाय. 
 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आघाडी सरकारने गेल्या एक ते दीड महिन्यात घेतलेल्या अनेक निर्णयांना महायुतीतील भाजप आणि स्वाभिमानी संघटनेने हरकत घेतली आहे. आघाडी सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांचा आम्ही फेरविचार करू आणि अयोग्य निर्णय रद्द करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला. फडणवीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे या निर्णयांविरोधातील आपली भूमिका मांडली.

मतदारांना लुभवण्यासाठी आघाडी सरकारने तब्बल १०७१ शासन निर्णय जाहीर केले आहेत. या सर्व निर्णयांना आपली हरकत  आहे. हे सर्व निर्णय स्थगित करावेत, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली. महायुतीची सत्ता आल्यास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार केला जाईल, असे ते म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.