मुंबई : आता एटीएममधून केवळ १०००, ५००, १०० रुपयांच्या नोटा मिळणार नाही तर त्याच्या जोडीला ५० रुपयांच्या नोटा मिळणार आहेत. आरबीआय म्हणजेच भारतीय रिर्झव्ह बॅंकेने ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेतलाय.
अधिक वाचा : आयकर विभागाच्या २ अधिकाऱ्यांना अटक, प्रिन्टरमध्ये सापडले पैसे
आरबीआयने बॅंकाने बजावले आहे की, सामान्यांच्या समस्या लक्षात घेऊन ५० रुपयांच्या नोटा एटीएममधून देण्यात याव्यात. त्यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न निर्माण होणार नाही. भारतीय स्टेट बॅंकेने आपल्या रायपूर येथील एटीएममधून ५० रुपयांच्या नोटा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
अधिक वाचा : सातवा वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर
एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही सेवा अन्य बॅंकांनीही सुरु केली पाहिजे. त्यासाठी एटीएम मशिनमध्ये थोडासा बदल करावा लागेल. यासाठी काही कालावधी लागेल. आरबीआरच्या आदेशामुळे एटीएममध्ये ५० रुपयांची नोट ठेवणे जरुरी आहे. त्यामुळे बॅंकांना १०० रुपयांच्या नोटेबरोबरच ५० रुपयांच्या नोटा ठेवणे आवश्यक आहे. २०१३ मध्ये आरबीआयने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा एटीएममधून देण्याचे सांगितले होते. त्यावेळी बॅंकांनी विरोध करत ही बाब अशक्य असल्याचे म्हटले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.