एटीएम सेवेसाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता

बँकेच्या कॅशियर समोर तासन तास रांगेत उभं न राहता, एटीएममध्ये अर्ध्या मिनिटांत पैसे हातात पडतात. ही सेवा ग्राहकांना सुखावणारी वाटत असली, तरी यापुढे या सेवेसाठी ग्राहकांच्या खिशाला चाट लागण्याची शक्यता आहे. कारण एटीएम सेवा वापरल्यानंतर आता एक निश्चित रक्कम आकारली जाणार आहे.

Updated: Jan 4, 2014, 07:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बँकेच्या कॅशियर समोर तासन तास रांगेत उभं न राहता, एटीएममध्ये अर्ध्या मिनिटांत पैसे हातात पडतात. ही सेवा ग्राहकांना सुखावणारी वाटत असली, तरी यापुढे या सेवेसाठी ग्राहकांच्या खिशाला चाट लागण्याची शक्यता आहे. कारण एटीएम सेवा वापरल्यानंतर आता एक निश्चित रक्कम आकारली जाणार आहे.
बँकेच्या या सर्व सेवांवर नियंत्रण ठेवणाऱ्या आरबीआयनेही आता यावर हरकत नसल्याचं जवळजवळ निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे. आरबीआयचे डेप्युटी गवर्नर के सी चक्रवर्ती यांनी यावर आरबीआयची हरकत नसल्याचं सांगितल्याने, या सेवांवर पैसे मोजावे लागण्याची शक्यता वाढली आहे.
चक्रवर्ती हे आरबीआयच्या बँकिंग सेवेचे इनचार्ज आहेत. मात्र अशा स्वरूपाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे अजून तरी आला नसल्याचंही चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे.
बँकांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेवरून ग्राहकांकडून एटीएमसेवेचे पैसे घेणे, तेवढंस सोप नसल्याचंही सांगण्यात येतंय. मात्र बंगळूरूत झालेल्या एटीएम हल्ल्यानंतर बँकांनी सुरक्षा द्यावी अशी मागणी वाढली आहे. यामुळे बँकांपुढे ही सेवा निश्चित शुल्क आकारल्याशिवाय कशी देणार असा प्रश्न उभा राहिला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.