सावधान ! मुंबईत लहान मुलांचे केले जातेय अपहरण

 मुंबईमध्ये लहान मुलांना पळवून नेऊन, त्यांना भीक मागायला भाग पाडणा-या टोळीचा पर्दाफाश झालाय. एका 14 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून, भीक मागण्यासाठी तिचे कसे हाल हाल करण्यात आलेत. एक विशेष रिपोर्ट...तुमची मुलं शाळेतून एकटी घरी येतात..? तर मग सावधान ! तुम्ही मुलांना एकटं घराबाहेर पाठवता..? तग मग सावध राहा. तुमच्या मुलांचं होऊ शकतं अपहरण... तेव्हा सावधान !

Updated: Jul 12, 2014, 09:52 AM IST
सावधान ! मुंबईत लहान मुलांचे केले जातेय अपहरण title=

मुंबई : मुंबईमध्ये लहान मुलांना पळवून नेऊन, त्यांना भीक मागायला भाग पाडणा-या टोळीचा पर्दाफाश झालाय. एका 14 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून, भीक मागण्यासाठी तिचे कसे हाल हाल करण्यात आलेत. एक विशेष रिपोर्ट...तुमची मुलं शाळेतून एकटी घरी येतात..? तर मग सावधान ! तुम्ही मुलांना एकटं घराबाहेर पाठवता..? तग मग सावध राहा. तुमच्या मुलांचं होऊ शकतं अपहरण... तेव्हा सावधान !
 
मुंबईत कधी कुणावर काय प्रसंग ओढवेल, याचा नेम नाही... आता या मुलीचंच उदाहरण पाहा..

  • नाव - पवित्रा परुमल 

  • वय - 14 वर्षे

  • हरवल्याची तारीख - 22 मार्च 2014

  • वेळ - संध्याकाळी 4.30 

  • आयडेंटीफिकेशन - शाळेचा गणवेश

  • पत्ता - शिवशक्ती नगर, धारावी

 
धक्का बसला ना..? कारण ती पवित्राच आहे. पवित्राचं अपहरण करण्यात आलं, तिच्या डोक्याचं मुंडन केलं गेलं, जबरदस्तीनं कपाळावर गोंदन काढण्यात आलं. हा सगळा अत्याचार तिच्यावर झाला तो तिला भीक मागायला लावण्यासाठी. सुरुवातीला पवित्राने भीक मागायला नकार दिला, तेव्हा तिला काठीनं जबर मारहाण करण्यात आली.

तिच्या शरीराच्या विविध भागांवर चटके देण्यात आले. या अत्याचारांमुळं नाईलाजानं तिला पाच महिने भीक मागावी लागली. दिवसाला 150 रुपये भीक मागून आणलेच पाहिजेत, अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली होती. रेल्वे स्टेशन, मंदिर अशा परिसरात ती भीक मागायची. मात्र तिच्या सुदैवानं काही दिवसांपूर्वी पवित्राच्या शाळेतल्या मैत्रिणीनं तिला ओळखलं. आणि पवित्राची भीक मागण्याच्या जाचातून सुटका झाली. 

पवित्रा हरवल्याची तक्रार तिच्या आईनं धारावी पोलीस स्टेशन आणि डोंगरीच्या बाल कल्याण समितीकडं केली होती. पवित्राला डोंगरीच्या बाल सुधारगृहात आणण्यात आलं. बाल कल्याण समितीपुढं तिला हजर केलं जात असतानाच, त्याठिकाणी एक महिला आपल्या मुलांना भेटण्यासाठी आली. पवित्रानं तिला अचूक ओळखलं. या बाईनंच आपलं अपहरण केल्याची माहिती पवित्रानं समितीला दिली. तेव्हा त्या बाईला आणि मुलं पळवणा-या पाचजणांच्या टोळीला पकडण्यात आलं. हे सगळे आरोपी सध्या धारावी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

हे केवळ एका मुलीसोबत घडतं, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. मुंबईत अशाप्रकारे शेकडो मुलांचं अपहरण होतं आणि त्यांना भीक मागण्यासाठी भाग पाडलं जातं. प्रथम या स्वयंसेवी संस्थेनं त्याबाबत अहवालच तयार केलाय. अनेक बाल भिक्षेक-यांची त्यांनी सुटकाही केलीय. आपल्या मुलांवर पवित्रासारखी वेळ येऊ द्यायची नसेल तर आताच काळजी घ्या. नाहीतर नंतर पश्चात्ताप करण्याची पाळी येईल, बरं का.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.