५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागानं घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Updated: Feb 23, 2015, 08:03 PM IST
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी title=

मुंबई : राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागानं घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 
 
८ बाय १२ आकाराची आणि ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर ही बंदी असेल.यापेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकचं विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. ही समस्या लक्षात घेत पर्यावरण मंत्र्यानी हा निर्णय़ घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
आतापर्यंत प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी होती. पण उत्पादनावर अटकाव नव्हता. पण आता या पिशव्यांचं उत्पादन करणाऱ्यांना ५ लाख दंड आणि ५ वर्ष सक्तमजुरी इतकी कडक शिक्षा होऊ शकते. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास पर्यावरणाला मोठा फायदा होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.