सोन्याचा भाव घसरल्यामुळे बँका मागत आहेत अतिरिक्त तारण

सोन्याच्या घसरत चाललेल्या किमतींमुळे ग्राहक जरी खुश झाले असले, तरी सुन्याच्या बदल्यात कर्ज देणाऱ्या बँकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे बँका आता ग्राहकांकडून गहाण सोन्याव्यतिरिक्त अतिरिक्त तारण मागत आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 17, 2013, 06:42 PM IST

www.24taas.com, मुंबई
सोन्याच्या घसरत चाललेल्या किमतींमुळे ग्राहक जरी खुश झाले असले, तरी सुन्याच्या बदल्यात कर्ज देणाऱ्या बँकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे बँका आता ग्राहकांकडून गहाण सोन्याव्यतिरिक्त अतिरिक्त तारण मागत आहेत. सोन्याच्या घटत्या किंमतींमुळे बँकांकडे ठेवलेल्या सोन्यात आणि दिल्या गेलेल्या रकमेतील अंतर कमी होत आहे. लोन टू व्हॅल्यू सेश्यो जास्त असणाऱ्या बँकांना याचा जास्त त्रास होत आहे.
जर तुम्ही एखाद्या बँकेकडे सोन्याच्या बदल्यात मोठ्या रकमेचं लोन घेतलं असल्यास बँक आता तुमच्याकडून जास्त तारण मागेल. कारण सोन्याचे भाव घसरत आहेत. आणि कर्जाची रक्कम जास्त आहे. आठवड्याभरात सोन्याचे भाव २० टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे आपलं नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त तारण मागितलं जात आहे. अनेक बँकांनी ग्राहकांकडे डिमांड नोटिस पाठवण्यास सुरूवात केली आहे. लोनच्या बदल्यात बँका ग्राहकांकडून आणखी सोनं किंवा नगद रक्कम मागत आहेत.
अतिरिक्त तारणाशिवाय बँका लोन टू व्हॅल्यू रेश्यो कमी करण्याचा विचार करत आहेत. सध्या कोटक महिंद्रा बँक आणि ICICI बँकेचा लोन टू व्हॅल्यू रेश्य़ो ९० टक्के आहे. ऍक्सिस बँकेचं ८०-८५ टक्के, बँक ऑफ बरोडाचं ७५ टक्के, स्टेट बँकेचे ७० टक्के आहे. गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांचा लोन टू व्हॅल्यू रेश्यो६० टक्के आहे. बँकांकडे सोन्याच्या बदल्यात जास्त कर्ज मिळत असल्याने ग्राहक पूर्वी बँकांकडे आकर्षित झाले होते. मात्र ता बँकांमध्येही सोन्याच्या बदल्यात कमी कर्ज मिळेल

बँका आधी गोल्ड लोन देण्याबद्दल फारशा उत्सुक नव्हत्या. NBFC साठी गहाण ठेवीच्या मोबदल्यात ६० टक्क्यांपर्यंत लोन देण्याची परवानगी देण्यात आली होती. तसंच क्रेडिट ग्रोथ फारसं नसल्यामुळे गोल्ड लोन वाढवण्याकडे बँकांचा पोकस वाढत होता.

कोटक महिंद्रा बँक 90% 90,000 रु

आयसीआयसआय बँक 90% 90,000 रु

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 80% 80,000 रु

बँक ऑफ बडोदा 75% 75,000 रु

स्टेट बँक ऑफ इंडिया 70% 70,000 रु

NBFCs 60% 60,000 रु