भांडूप येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर शाळेत बलात्कार

मुंबईतील एका शाळेत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडूपच्या एका इंग्रजी माध्यमच्या शाळेत हा प्रकार घडलाय.

Updated: Dec 17, 2014, 02:46 PM IST
भांडूप येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर शाळेत बलात्कार title=

मुंबई : मुंबईतील एका शाळेत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडूपच्या एका इंग्रजी माध्यमच्या शाळेत हा प्रकार घडलाय.

पीड़ित मुलीला या नराधमानं गोड बोलून स्वच्छतागृहात नेलं आणि तिथंच तिच्यावर बलात्कार केला. शाळेतल्याच एका कर्मचार्यनं हे कृत्य केल्याचं मुलीनं केलेल्या वर्णनावरून स्पष्ट होत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी शोध घेण्यासाठी शाळेतल्या सर्व कर्मचा-यांची चौकशी केली. त्यानंतर एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.