'बीग बी'चं मेकअपमॅनला बीग गिफ्ट

आपण जे स्वप्न बघतो ते खरे होतेच असे नाही, किंवा खरं होण्यासाठी त्या मागे खूप मेहनत घ्यावी लागते. पण दीपक सावंत यांच्या पत्नी सरोद यांचं असंच एक स्वप्न पूर्ण झालयं आणि त्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात महानायक अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केलयं. 

Updated: Jul 27, 2014, 07:38 PM IST
'बीग बी'चं मेकअपमॅनला बीग गिफ्ट title=

मुंबई: आपण जे स्वप्न बघतो ते खरे होतेच असे नाही, किंवा खरं होण्यासाठी त्या मागे खूप मेहनत घ्यावी लागते. पण दीपक सावंत यांच्या पत्नी सरोद यांचं असंच एक स्वप्न पूर्ण झालयं आणि त्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात महानायक अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केलयं. 

आपल्याकडे एकतरी गाडी असावी असं सगळ्यांच स्वप्न असतं आणि सरोद यांचंही हेच स्वप्न होतं. रेंज रोव्हर गिफ्ट देऊन पूर्ण केलंय.

अमिताभ बच्चन यांचे मेकअप मॅन दीपक सावंत यांच्या पत्नी सरोद यांची प्रकृती नाजूक असल्यानं हॉस्पिटलच्या सतत चकरा त्यांना घालाव्या लागतात. दीपक सावंत यांचा बराच पैसा उपचारावरच खर्च होतो. त्यामुळे कुटुंबीयांच्या इतर गरजा भागवणं त्यांना शक्य होत नाही. 

दीपक सावंत आणि बच्चन कुटुंबाशी घरोब्याचे संबंध आहे. सरोद यांच्या इच्छेबद्दल अमिताभ यांना जेव्हा कळाले, तेव्हा जराही विचार नं करता स्वत:ची 'रेंज रोव्हर' गाडी त्यांना गिफ्ट केली.

भेट दिलेली 'रेंज रोव्हर' गाडी ही अमिताभ बच्चन आवडत्या गाड्यांमधली एक आहे. अमिताभ बच्चन हे एखादी गाडी फक्त तीन ते चार वर्षे ठेवतात. आज भारतात या गाडीची किंमत ४० लाखांपेक्षाही जास्त आहे. 

सावंत यांच्या घराबाहेरच पार्क केलेल्या गाडीबद्दल दिपक सावंत यांना विचारले असता त्यांनी हा खासगी विषय असल्याचे सांगितले. पण अमिताभजींनी माझ्या पत्नीला ही गाडी भेट केल्याचे त्यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.