मुंबई : राज्यात धान्य वितरण आता बायोमेट्रिक पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
काही महिन्यापूर्वी आधारकार्ड रेशन कार्डशी लिंकअप करण्याचं काम, काही ठिकाणी हाती घेण्यात आलं आहे. यामुळे रेशनच्या लाभार्थींना रेशनचं अनुदान थेट बँक अकाउंटवर मिळणार आहे.
बायोमेट्रीक पद्धतीने रेशन वाटप
धान्य वितरणात भष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या असून पात्र व्यक्तीला धान्य न मिळणे , धान्य बाजारात परस्पर विकले जाणे अशा तक्रारी जास्त आहेत . त्यामुळेच येत्या काही दिवसात राज्यात १८ ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतिवर धान्य वितरण सुरु केले जाणार आहे.
यामध्ये पात्र व्यक्ती धान्य घेताना अंगठाद्वारे धान्य वितरण केंद्रावर नोद करेल. याची नोंद थेट पात्र व्यक्तीच्या चेहऱ्यासह पुरवठा अधिकाऱ्याकडे होणार आहे . त्यामुळे धान्य वितरणात होणाऱ्या भष्टाचाराला आळा बसेल, काळाबाजाराला अटकाव होईल, असा सरकारला विश्वास आहे .
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.