'आयआरसीटीसी'च्या गोंधळामुळे प्रवासी हैराण

'आयआरसीटीसी'ची वेबसाईट कधी काय अडचणी उभ्या करेल याचं काहीही सांगता येत नाही. कारण लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी ११०५७ एलटीटी-अमृतसर-धुळे ही गाडी अस्तित्वात नसल्याचं, 'आयआरसीटीसी'ची वेबसाईट दाखवतेय.

Updated: Nov 25, 2014, 03:16 PM IST
'आयआरसीटीसी'च्या गोंधळामुळे प्रवासी हैराण title=

मुंबई : 'आयआरसीटीसी'ची वेबसाईट कधी काय अडचणी उभ्या करेल याचं काहीही सांगता येत नाही. कारण लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी ११०५७ एलटीटी-अमृतसर-धुळे ही गाडी अस्तित्वात नसल्याचं, 'आयआरसीटीसी'ची वेबसाईट दाखवतेय.

ऑनलाईन बुकिंग करतांना तुम्ही एलटीटी ते धुळे असं तिकीट बुक करण्याचं ठरवलं, तर चित्रात दाखवल्याप्रमाणे मॅसेजेस तुम्हाला मिळतील.

ही गाडी दररोज एलटीटीवरून रात्री ११.४५ ला सुटते, सकाळी सव्वा सातपर्यंत धुळ्यात पोहोचते, धुळेकरांसाठी ही एकमेव गाडी आहे, त्यातही तिचं ऑनलाईन बुकिंग होत नसल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.