मुंबई : 'झी २४ तास'नं युती तुटल्याचं वृत्त दाखवल्यानंतर राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली. महायुतीच्या नेत्यांचीही धावपळ सुरू झाली. युती टिकावी अशीच भूमिका घेतल्याचं भाजप सांगत असलं तरी युती तोडण्याची प्रस्तावनाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
भाजपमध्ये सकाळपासूनच बैठकांचा धडाका सुरू झाला. मुंबईपासून दिल्लीपर्यंत. दरम्यान, शिवसेना-भाजपमध्ये घोळ सुरू असताना आता युतीतल्या घटकपक्षांनीही स्वबळाची तयारी केल्याचं दिसतंय. त्याचवेळी भाजपच्या इशाऱ्यानंतर महायुतीतील घटक पक्ष युती टिकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. हवं तर आमच्या जागा घ्या, पण युती टिकवा असे या घटक पक्षांकडून सांगण्यात येत आहे.
'झी २४ तास'नं युती तुटल्याचं वृत्त दाखवल्यानंतर राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली. महायुतीच्या नेत्यांचीही धावपळ सुरू झाली. युती टिकावी अशीच भूमिका घेतल्याचं भाजप सांगत असलं तरी युती तोडण्याची प्रस्तावनाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. भाजपनं आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेला अनेक मुद्यांवरून लक्ष्य केलं.
नेहमी भाजपनंच त्याग का करावा असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय. तसंच भाजपनं नेहमीच संयमाची भूमिका ठेवलीय. त्यामुळं मित्र पक्षानं चूक करू नये, असा इशारा वजा सल्लाही द्यायाला भाजप विसरला नाही.
गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना भाजपवर वर्चस्व गाजवत असल्याचा तक्रारीचा सूर भाजप नेत्यांमध्ये आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विरोधातली भाजपमधली ही खदखदच जागावाटपाच्या निमित्तानं बाहेर पडली असून युती तोडण्याच्या दृष्टीनंच टाकलेलं पाऊल असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं युती तोडल्याची घोषणा कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
'महायुती तोडू नका'
महायुती तुटल्यास महाराष्ट्रात सत्ता येऊ शकत नाही. एक-एक पाऊल मागे घ्या आणि महायुती तुटू देऊ नका असा सल्ला आरपीयआय नेते रामदास आठवले यांनी दिलाय. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे असते तक महायुती तोडू दिली नसती असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.
विरोधकांची टीका
महायुती तुटलेली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसनं खोडी केलीय. शिवसेनेला सहानभूती दर्शवत, युतीच्या मैत्रीत भाजप प्रामाणिकपणे वागला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर पाटील यांनी केलीय. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत, असा घाणाघाती आरोपही त्यांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.