मोदींच्या आदेशाला भाजप नेत्यांचाच हरताळ, नातेवाईकांना दिली तिकीट

निवडणुकीमध्ये नेत्यांनी नातेवाईकांना तिकीट देऊ नये असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते.

Updated: Feb 2, 2017, 08:36 AM IST
मोदींच्या आदेशाला भाजप नेत्यांचाच हरताळ, नातेवाईकांना दिली तिकीट title=

मुंबई : निवडणुकीमध्ये नेत्यांनी नातेवाईकांना तिकीट देऊ नये असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आदेशाला भाजप नेत्यांनीच हरताळ फासला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप नेत्यांनी त्यांच्या नातेवाईकांनाच तिकीट दिली आहेत.

भाजपकडून खासदार किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या, आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा भाऊ विनोद शेलार यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.