मुंबई : शिवसेना-भाजपवर करमणूक कर लावा, असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला. त्याचवेळी भरमसाठ दिलेली आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाळणार कशी, असा सवालही झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत चव्हाण यांनी उपस्थित केला.
शिवसेना - भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. मात्र, हे केवळ दिखावूपणा आहे. या दोघांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे लोकांची करमणूक होत आहे. त्यांच्यावर करमणूक कर लाववा पाहिजे, असा बोचरा टोला लगावला.
शिवसेना भाजप सरकारमधून बाहेर पडणार नाही. शिवसेना म्हणते राम मंदिर कधी बांधणार, तारीख सांगा. आता तिचवेळ शिवसेनेवर आली आहे. सत्तेतून बाहेर कधी पडणार, त्याची तारीख सांगा, असे आव्हान चव्हाण यांनी शिवसेनाला दिला आहे.
दरम्यान, जर शिवसेनेने पाठिंबा काढला तर आम्ही मध्यावर्ती निवडणुकीसाठी तयार आहोत, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले.