मुंबई महापालिका निवडणूक, २१६ उमेदवारांवर गुन्हे दाखल

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी रणांगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असल्याचे समोर आलंय. 

Updated: Feb 17, 2017, 12:48 PM IST
मुंबई महापालिका निवडणूक, २१६ उमेदवारांवर गुन्हे दाखल title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी रणांगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असल्याचे समोर आलंय. 

पालिकेच्या रणसंग्रामात उतरलेल्या उमेदवारांपैकी 1641 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरुन ही माहिती समोर आलीय. 216 जणांवर गुन्हे दाखल असून त्यातील 154 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

त्यापैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे शिवसेनेचे असून त्यापाठोपाठ काँग्रेसचे उमेदवार आहेत. विविध पक्षीय उमेदवारांनी निवडणूक आयोगापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपशील दिलाय.