मुंबई : मुंबई मॅरेथॉन अडचणीत आलीय. मॅरेथॉनचा व्यावसायिक वापर होत असल्याने शुल्कात सवलत देण्यास आयुक्तांनी नकार दिलाय. ए वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी आयोजकांना याप्रकरणी नोटीस पाठवलीय. तर आयोजकांना 24 तासांत साडेपाच कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आलेत.
होर्डींग, बॅनर, लेझर शो, जाहिरातीपोटी हे शुल्क भरण्याचे आदेश देण्यात आलेत. मॅरेथॉन हा सामाजिक उपक्रम नसून व्यावसायिक हेतूने चालविले जात असल्याचा ठपका मुंबई महानगरपालिकेने ठेवलाय.